Thursday , December 11 2025
Breaking News

श्री दुर्गा माता दौडीतून नारीचा शक्तीचा संदेश!

Spread the love

 

बेळगाव : देव देश आणि धर्म जागृतीचा संदेश देत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे बेळगावात अखंड श्री दुर्गा मातादौडचे २६ वे वर्ष पार पडले. आज ९ व्या दिवशी श्री दुर्गा माता दौडीला बेळगाव शहरातील ताशिलदार गल्ली, श्री सोमनाथ मंदिर येथून श्री सिद्धिदात्रीच्या पूजेसह प्रदक्षिणा घालण्यात आली.

श्री दुर्गामाता दौड यांनी प्रेरक मंत्राने धर्मध्वज फडकावून सुरुवात केली. प्रत्येक गल्ली नववधूसारखी सजली होती. दौडीत विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. आबालवृद्धांनी भगवे फेटे बांधून पांढऱ्या रंगाच्या वेशभूषा करून दौडीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांवरील बलात्कार रोखण्यासाठी बाल भवानी, छत्रपती शिवाजी महाराज या जिवंत रूपकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुवासिनींनी आरती करून दौडचे स्वागत केले.ती फुलबाग गल्ली, पाटील गल्ली, शनिमंदिर रोड, मठ गल्ली, कलमठ रोड, अनंतशयन गल्ली, टिळक चौक, शेरी गल्ली, छत्रपती शिवाजी रोड, मुजावर गल्ली, तानाजी गल्ली, भांडूर गल्ली, महाद्वार रोड, कपिलेश्वर मंदिर ओव्हर ब्रिजवरून शनी मंदिर येथे जाऊन समाप्त झाली. श्री दुर्गामाता दौड तरुणांना नवचैतन्य जागृत करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आत्मसात करण्यासाठी प्रेरित करते.

उद्या श्री दुर्गा माता दौडच्या शेवटच्या दहाव्या दिवसाची सुरुवात मारुती गल्लीतील श्री मारुती मंदिरापासून सुरू होणार आहे. नरगुंदकर भावे चौक, श्री महालक्ष्मी मंदिर, बसवन गल्ली, देशपांडे गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक , रिज टॉकीज रोड, कोनवाळ गल्ली, अनसुरकर गल्ली, हुतात्मा चौक, संयुक्त महाराष्ट्र चौक, नार्वेकर गल्ली, काकतीवेस, गणचारी गल्ली, गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, कंग्राळ गल्ली, सरदार रोड, कॉलेज रोड, राणी चन्नम्मा सर्कल, काळी आमराई, गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड मार्गे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथे संपेल. परमपूज्य श्री तुकाराम महाराजांचे ११वे वंशज ह.भ.प. शिरीष मोरे यांचे येथे श्री दुर्गा माता दौडच्या समारोप समारंभात मार्गदर्शन होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

मच्छे शाळा सुधारणा कमिटी अध्यक्षपदी गजानन छप्रे

Spread the love  मच्छे : गावातील सरकारी मॉडेल प्राथमिक केंद्र शाळा, मच्छे येथे शाळा सुधारणा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *