बेळगाव : पाटील गल्ली येथील अध्यापक कुटुंबियांच्या श्री शनी मंदिराला खासदार जगदीश शेट्टर यांनी भेट देऊन दर्शन घेतले. खासदार शेट्टर यांच्या हस्ते पूजा, आरती करून जगकल्याणार्थ प्रार्थना करण्यात आली. पूजेचे पौरोहित्य मंदिराचे ट्रस्टी प्रकाश अध्यापक यांनी केले. यावेळी युवा नेते आणि भाजप ओबीसी मोर्चाचे किरण जाधव उपस्थित होते. श्री शनी मंदिर ट्रस्टच्या वतीने ट्रस्टी विलास अध्यापक यांनी खासदार शेट्टर यांचा सत्कार केला. यावेळी मंदिराची माहिती खासदारांना देण्यात आली. मंदिराच्या जीर्णोध्दार आणि विकासासाठी आपल्याकडून शक्य ते सहकार्य करू असे आश्वासन खासदार जगदीश शेट्टर यांनी दिले. यावेळी भाजप कार्यकर्ते संजय भंडारी, ज्योती शेट्टी आणि भक्त मंडळी उपस्थित होती.
Belgaum Varta Belgaum Varta