बेळगाव : गणेश दूध संकलन केंद्रातर्फे उत्पादित होणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांची अन्न व औषध विभागातर्फे तपासणी करुन गुणवत्ता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी गणेश दूध संकलन केंद्राचे चालक उमेश ऊर्फ प्रवीण देसाई म्हणाले, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची प्रक्रिया, पॅकेजिंग, स्वच्छता आदींची अन्न व औषध निरीक्षक कंकणवाडी यांनी पाहणी केली. सध्या दुग्धजन्य पदार्थांत भेसळीचे प्रमाण वाढत असल्याने असे प्रकार नक्कीच गंभीर आहेत. विविध ठिकाणी असे प्रकार आढळत असताना गणेश दूधच्या उपपदार्थांचे नमुने घेण्यात आले होते. दूधापासून बनणारे विविध उपपदार्थ अनेक टप्प्यातून जातात. मार्गदर्शन तत्वांचे पालन करूनच उपपदार्थ निर्मिती केली जाते. उपपदार्थ तपासणीनंतर गणेश दुधाच्या पदार्थांची विनाभेसळ गुणवत्ता सिद्ध झाली आहे. आहार निरीक्षक कंकणवाडी यांनी गणेश दूध केंद्रात प्रत्यक्ष निर्मिती प्रक्रियेची माहिती जाणून समाधान व्यक्त केले, असे सांगितले. यावेळी मॅनेजर सुधाकर करटे उपस्थित होते.