Thursday , March 5 2026
Breaking News

बिम्समधील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळंतीण महिलेचा मृत्यू

Spread the love

बेळगाव : बिम्स डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जिल्हा रुग्णालयात घडली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील नागनूर तांडा येथील कल्पना राठोड या मृत महिलेचे नाव आहे. काल रात्री तिने शस्त्रक्रियेद्वारे मुलाला जन्म दिला. आई आणि बाळ निरोगी असून कोणतीही अडचण नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

मात्र मंगळवारी सकाळी डॉक्टरांनी प्रकृती बिघडली असल्याचे जाहीर केले. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी बाळंतीण कल्पना राठोड हिला अन्यत्र रुग्णालयात हलविण्यात यावे अशी मागणी केली मात्र बिम्स मधील डॉक्टरांनी नकार दिला आणि तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या मुलीच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा संताप व्यक्त करत त्यांच्या मुलीच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या आवारात निदर्शने केली.

About Belgaum Varta

Check Also

कावळेवाडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

Spread the love  बेळगाव : कावळेवाडी येथील संत ज्ञानेश्वर पारायण मंडळ व भजनी मंडळातर्फे दरवर्षी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *