Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगाव शहर आणि तालुका म. ए. समितीची संयुक्त बैठक रविवारी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी दुपारी दोन वाजता मराठा मंदिर कार्यालय खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीत कर्नाटक सरकारच्या बेळगाव येथे होणाऱ्या अधिवेशनासंदर्भात चर्चा होणार असून कार्यकर्त्यांनी या बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले विचार व्यक्त करावेत, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उपाध्यक्ष श्री. बी. ओ. येतोजी आणि सरचिटणीस श्री. मालोजी अष्टेकर तसेच तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार श्री. मनोहर किनेकर व सरचिटणीस श्री. एम. जी. पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे बेळगाव विमानतळावर स्वागत

Spread the love  बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील तीर्थ क्षेत्र यडूर येथील श्री वीरभद्रेश्वर मंदिरात आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *