बेळगाव : दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्था व सुवर्ण लक्ष्मी को ऑप क्रेडिट सोसायटी ली. यांच्या संयुक्त विद्यमानाने सोसायटीच्या सभागृहात कै. जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ यांची 219 वी जयंती साजरी करण्यात आली.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन विठ्ठल शिरोडकर तसेच प्रमुख पाहुणे प्रदीप अर्कसाली, संस्थेचे संस्थापक मोहन कारेकर, व्हाईस चेअरमन विजय सांबरेकर, दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायक कारेकर उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करून नाना यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल शिरोडकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. विनायक कारेकर यांनी प्रमुख पाहुणे प्रदीप अर्कसाली यांची पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला
सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल शिरोडकर यांनी आपल्या भाषणात नानांच्या सामाजिक व आर्थिक कार्याबद्दल विचार मांडताना म्हणाले की, पिढीजात सुवर्ण श्रीमंत घराण्यात जन्मलेले नानानी सामाजिक आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी वेळोवेळी शैक्षणिक आर्थिक मदत केली. शिक्षणाला प्राधान्य देऊन महाविद्यालयाची स्थापना केली. मुंबई शहराची जडणघडण करण्यात नानाने मोठे योगदान दिले.
यावेळी संस्थेच्या संचालिका सौ. मधुरा शिरोडकर यांनीही आपले विचार मांडले. त्या म्हणाल्या नाना शंकर शेठ सर्व समाजासाठी प्रेरणास्थान होते. ब्रिटिश कालावधीत सुद्धा सर्व बांधवांना एकत्रित करून सामाजिक आर्थिक शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात प्रगती केली त्यांनी नानांच्या जीवनाविषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाला सोसायटीचे संचालक प्रकाश वेर्णेकर, समर्थ कारेकर, राजू बांदिवडेकर, विराज सांबरेकर यांच्यासह शैलेश शिरोडकर, नितीन कलघटकर, विलास आंबेकर, सुधीर शिरोडकर, अमित हेरेकर इतर कर्मचारी व हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सोसायटीचे सेक्रेटरी अभय हळदणकर यांनी केले.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …