
बेळगाव : यावर्षी बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 120 नवजात शिशु आणि 11 बाळंतिण महिलांचा मृत्यू झाला आहे.
बल्लारीमध्ये देखील दूषित सलाईनमुळे अशाच मृत्यूनंतर भाजपच्या कर्नाटक महिला मोर्चाने राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे.
नुकताच बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेल्या कुंदरगी गावातील पूजा कडकभावी या महिलेच्या घरी भेट देऊन कर्नाटक राज्य भाजप महिला मोर्चा पदाधिकारी प्रदेश सचिव डॉ. सोनाली सरनोबत, राज्य उपाध्यक्षा शांभवी अश्वथपुरे, बेळगाव ग्रामीण महिला अध्यक्षा डॉ. नयना भस्मे यांनी मृत कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी गोकाक भाजप मंडल अध्यक्ष राजेंद्र गौडपगोळ, आनंद अप्पुगोळ, शिवानंद टोपगी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta