बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे स्वरचित काव्य लेखन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी गटात चाळीस स्पर्धकांनी तर खुला गटात पंचवीस कविंनी सहभाग घेऊन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
स्पर्धा निकाल.. विद्यार्थी गट प्रथम क्रमांक कु.अनुष्का राजीव पाटील, मराठी विद्यानिकेतन बेळगाव, द्वितीय क्रमांक.. भक्ती युवराज बाळेकुंद्री, बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी, तृतीय क्रमांक.. वैष्णवी रवळू जाधव, मराठी प्राथमिक शाळा बिजगर्णी.
खुला गट.. प्रथम क्रमांक.. श्री.भरत विठ्ठल गावडे, बेळगाव.द्वितीय क्रमांक..म्हातरु भातकांडे, वडगाव. तृतीय क्रमांक.. श्रीमती सरोज ना.जाधव, सह्याद्री नगर, बेळगाव.
या स्पर्धेत दर्जेदार विविध विषयांवर कविंनी कविता पाठवल्या होत्या. विषय निवड, आशय मांडणी, काव्य गुण, प्रतिभा आरंभ शेवट, परिणाम अशा निकष पूर्ण विचार करून पहिले तीन क्रमांक निवडण्यात आले.
विजेत्या कविंचे संस्थेतर्फे अभिनंदन केले आहे.
विजेत्यांना रोख रक्कम प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. बक्षीस वितरण समारंभ बिजगर्णी हायस्कूलमध्ये रविवार दि. ५ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.
आयोजित करण्यात येणार आहे. वेळ व दिनांक नंतर कळविण्यात येईल असे अध्यक्ष वाय पी नाईक यांनी सांगितले
Belgaum Varta Belgaum Varta