Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी म्हणून चेतनसिंग राठोड यांनी स्वीकारला पदभार

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या चेतनसिंग राठोड याना निर्गमित आयजीपी विकासकुमार विकास यांनी पदभार सोपवला.
बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी विकासकुमार विकास यांची अन्यत्र बदली झाल्यानंतर चेतनसिंग राठोड यांनी बेळगाव उत्तर विभागाचे नवे आयजीपी म्हणून पदभार स्वीकारला. निर्गमित आयजीपी विकासकुमार विकास यांनी त्यांना अधिकारपदाची सूत्रे सोपवली. पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना नूतन आयजीपी चेतनसिंग राठोड यांनी सांगितले की, त्यांना, हावेरीत असताना उत्तर विभागात काम करण्याचा अनुभव आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्राधान्य दिले जाईल. लोकहिताच्या दृष्टीने लोकाभिमुख पोलीस म्हणून काम करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले. गुन्हे कमी करण्यासाठी पोलिस ठाण्यांची संख्या वाढवण्यासाठी अभ्यास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगावचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद, अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रुती, बसापुरे आणि इतर अधिकाऱ्यांनी निर्गमित आयजीपी विकासकुमार विकास यांना निरोप दिला आणि नूतन आयजीपी चेतनसिंग राठोड यांचे स्वागत केले.

About Belgaum Varta

Check Also

कावळेवाडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

Spread the love  बेळगाव : कावळेवाडी येथील संत ज्ञानेश्वर पारायण मंडळ व भजनी मंडळातर्फे दरवर्षी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *