
बेळगाव : शहरातील अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्ती अनावरण आणि समाज भवन उद्घाटन समारंभ गोंधळात अडकला आहे. एका बाजूला, गावकऱ्यांनी सर्व तयारी पूर्ण करून अनावरण समारंभाला सुरुवात करण्यासाठी पालिकेला वाव दिला, तर दुसऱ्या बाजूला महापौर आणि उपमहापौर यांच्या उपस्थितीत आज केवळ वास्तुशांती कार्यक्रम पार पडला.
बेळगाव महापालिकेस भेट देऊन महापौर आणि आयुक्तांना निवेदन देणाऱ्या अनगोळच्या शिव- शंभू भक्तांनी, अनगोळ चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य मूर्तीचे अनावरण घाईगडबडीने केले जात असल्याचा आरोप केला. तथापि, या अनावरणाच्या तयारीला पूर्ण वेळ मिळावा म्हणून ५ जानेवारी पर्यंत वेळ द्यावा, अशी त्यांनी विनंती केली. रात्री झालेल्या बैठकीतही याच निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आज त्या ठिकाणी वास्तुशांती कार्यक्रम पार पडला. मात्र, तेथे कामे अपूर्ण होती. यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान होतो, असे शिव-शंभू भक्तांनी सांगितले. यापूर्वी ४-५ वेळा अनावरणाच्या तारीख जाहीर झाल्या होत्या. मूर्ती अनावरणाला आमचा विरोध नाही, पण गावकऱ्यांनी ठरवलेल्या आणि निश्चित केलेल्या तारखेला कामे पूर्ण करून मूर्तीचे अनावरण करणे आवश्यक आहे, अशी त्यांनी मागणी केली.

Belgaum Varta Belgaum Varta