
बेळगाव : कॅपिटल वन करंडकासाठी सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये आज एकूण सात सादरीकरणाने सुरुवात झाली.
सकाळी मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजनाने झाली. सकाळी 11 ते 3 च्या सत्रात 4 एकांकिका ट्रेलर, कलम 375, ओळख व दशावतार या एकांकीकांचे सादरीकरण झाले. संध्याकाळी दुसऱ्या सत्रात चाचरणाऱ्या फॅन्टसीचे युध्द, लेखकाचा कुत्रा व नदीकाठचा प्रवास सादर करण्यात आल्या. सर्वच एकांकीकेना बहुसंख्येने रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
डॉ.डी वाय पाटील पॉली, कोल्हापूर यांनी “ट्रेलर” ही एकांकिका सादर केली.
सारांश – ज्यांची कुणाशी मैत्री होत नसते त्यांना मैत्रीची गरज असते त्या विरुध्य सतत न्यायासाठी झगडणारी काही तरुण मंडळी असतात. यांच्यातील संघर्ष दाखवणारी ही एकांकिका
परिवर्तन कला फाउंडेशन, कोल्हापूर यांनी “कलम 375” ही एकांकिका सादर केली.
सारांश – स्त्रियांवर नेहमीच बलात्कार होतात पण पुरुषांवर बलात्कार झाला तर होणारी हतबलत्ता, मानसिकता येथे प्रगट केली आहे. तसेच न्यायालयात होणाऱ्या संघर्षाचे दर्शन ही घडवते
दृष्टी पुणे यांनी “ओळख*” ही एकांकिका सादर केली.
सारांश – रेल्वे स्टेशनवर थांबलेल्या एका तरुणी समोर एक तरुण प्रगट होतो. तो तिची जुनी ओळख दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्या दोघांची ओळख आहे. की नाही हे प्रेक्षकांना शेवट पर्यंत समजत नाही. उत्सुक वाढवणाऱ्या संवादातून त्यांची ओळख होती हे शेवटी समजते
अभय थिएटर अकादमी गोवा यांनी “दशावतर” ही एकांकिका सादर केली.
सारांश – एका जुन्या नाट्यकलाराचा सत्कार करताना तो बेशुद्ध पडतो पण त्यांच्या समोर दशावतारातील प्रल्हादाची कथा जेव्हा सादर केली जाते. तेव्हा तो शुद्धीवर येतोच पण त्याचा उत्साही वाढतो दशावतारातील नाट्य कलाकारांचे वैभव सांगणारे हे कथानक.
Belgaum Varta Belgaum Varta