
बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप करत आज बेळगावात दलित संघर्ष समिती भीमवाद तर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली.
बेळगाव येथील राणी चेन्नम्मा सर्कल येथे शनिवारी दलित संघर्ष समिती भीमवादतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. त्याचवेळी गृहमंत्री अमित शहा यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली आणि शाह यांच्या हद्दपारीसाठी जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.त्यानंतर मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी आंदोलक महादेव तळवार म्हणाले की, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत आम्ही आंबेडकर आंबेडकर म्हणणार आहोत. आंबेडकरांशिवाय स्वर्गाची गरज नाही. आंबेडकर हे फक्त नाव नाही. भारताचा श्वास आहेत . त्यांचा अपमान आपण सहन करणार नाही, असे ते म्हणाले. रामण्णा चव्हाण यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला. अमित शहा यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी केली. आंबेडकरांचा अपमान अमित शाह यांचा पंतप्रधान मोदींनी राजीनामा घ्यावा अशी मागणी आणखी एका आंदोलकाने केली. त्यांनी संसदेत आंबेडकरांचा अवमान करून संपूर्ण दलित समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणतात ते दलित समर्थक आहेत, पण हे दलितविरोधी सरकार आहे.यावेळी राज्य संघटक कोषाध्यक्ष सिद्धप्पा कांबळे, जिल्हाध्यक्ष महांतेश तळवार आदींसह नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
Belgaum Varta Belgaum Varta