बेळगाव : बेळगाव येथील जे एन एम सी सुवर्ण आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात स्विमर्स क्लब आयोजित निमंत्रितांच्या जलतरण स्पर्धेत आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करून दुसऱ्या क्रमांकासह रनर्सअप चॅम्पियनशिप मिळविली तर अद्वैत जोशी याने ग्रुप पाच मध्ये सात पदके संपादन करून वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळविली. या स्पर्धेत विविध राज्यातून अनेक जलतरणपटूंनी भाग घेतला होता.
जलतरणपटूंची कामगिरी पुढील प्रमाणे
मुले ग्रुप एक- स्वरूप धनुचे एक सुवर्ण पाच रौप्य एक कास्य, तनुज सिंग एक सुवर्ण चार रौप्य दोन कास्य, वेदांत पाटील तीन रौप्य, धवल हनमनावर दोन रोप्य, चिन्मय बागेवाडी एक रौप्य, ग्रुप दोन -प्रजीत मयेकर एक रौप्य, अनिश काकतकर एक कास्य, ग्रुप तीन- अमोघ रामकृष्ण दोन सुवर्ण दोन रौप्य चार कास्य, वरद खानोलकर दोन रौप्य एक कास्य, मोहित काकतकर एक रौप्य एक कास्य, अर्णव किल्लेकर एक रौप्य दोन कास्य, ग्रुप चार दक्ष जाधव एक रोप्य एक कांस्य, ग्रुप पाच- अद्वैत जोशी तीन सुवर्ण चार रौप्य, अगस्त्या बागी दोन सुवर्ण दोन रौप्य, हर्षवर्धन कर्लेकर दोन सुवर्ण, विराट उप्पार दोन सुवर्ण, मास्टर्स ग्रुप श्री अरुण जाधव एक रौप्य, मुली ग्रुप एक- वेदा खानोलकर एक सुवर्ण चार रौप्य तीन कास्य, अवनी शहापूरकर दोन रौप्य एक कास्य, ग्रुप दोन- प्रिषा पटेल तीन रौप्य एक कास्य, अनन्या रामकृष्ण एक रोप्य एक कास्य, वैशाली घाटेगस्ती एक कांस्य, ग्रुप तीन- आरोही चित्रगार एक सुवर्ण तीन रौप्य एक कास्य, कनक हलगेकर एक कास्य, ग्रुप चार- निधी मुचंडी एक सुवर्ण चार रौप्य तीन कांस्य, अमूल्यi केष्टीकर दोन रौप्य चार कास्य, ओवी जाधव एक रौप्य एक कास्य, ग्रुप पाच- आराध्या तिवारी तीन रौप्य, लावण्या जक्कन्नावर दोन रौप्य. ग्रुप सहा- केतकी बिरजे एक रौप्य, सहेली भांदुर्गे एक कास्य
वरील सर्व जलतरणपटूना आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबचे जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, रणजीत पाटील, संदीप मोहिते, शिवराज मोहिते, मारुती घाडी, किशोर पाटील, कल्लप्पा पाटील, भरत पाटील, विशाल वेसणे, विजय नाईक, प्रसाद दरवंदर, निखिल बेकने, प्रांजल सुळधाळ, ओम घाडी, विजय भोगण, चंद्रकांत बेळगोजी या सर्वांचे बहुमोल मार्गदर्शन तसेच क्लबचे पदाधिकारी ऍड. मोहन सप्रे, श्री. शितल हुलबत्ते, श्री. अरविंद संगोळी, सौ. शुभांगी मंगळूरकर यांचे प्रोत्साहन लागते.
Belgaum Varta Belgaum Varta