
बेळगाव : बीड जिल्ह्यातून मनगुत्ती व हत्तरगी भागात कामासाठी आलेल्या कुटुंबांना ‘ऑपरेशन मदत’ ग्रूपच्या माध्यमातून इनरव्हील क्लबने रेशन किट, महिलांसाठी साड्या व इतर कपडे, लहान बालकांना कपडे, खाऊ आणि बिस्कीटे वाटण्यात आली. नंतर महावीर स्कूल येथील शालेय विद्यार्थ्यांना एक्साम पॅड वितरीत करण्यात आले. तसेच ऑटोनगरच्या आंबेडकर कॉलनीत राहणारी व्यक्ती 7/8 वर्षापासून आजारी आहे, त्यांना झोपण्यासाठी एअर बेड, रेशन किट, शाल व कपडे दिले. यावेळी मेधा शहा, प्रियांका शहा, तेजस्विनी हजारे, राहूल पाटील, सुधीर चौगुले, अनील चौगुले, सागर गुतगी, नौशाद व उत्तम मगदूम हे कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्रातील बिड जिल्ह्यातील गरीब ऊसतोड कामगार आपला कुटूंब कबीला घेऊन दरवर्षी ऊसतोडीसाठी पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील साखर कारखान्याच्या क्षेत्रात कामासाठी येऊन गुजराण करतात. ‘ऑपरेशन मदत’ ग्रूपच्यावतीने दरवर्षी बेळगांव, हुक्केरी, खानापूर, गोकाक तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी ऊसतोडीसाठी आलेल्या कुटूंबाना मदत केली जाते. महिलांना साड्या व इतर कपडे, पुरूषांचे कपडे, लहान बालकांना कपडे, मुलांं-मुलींना कपडे, शिक्षणासाठी शालेय पुस्तके व वह्या, पेन/पेन्सिली, कंपास बॉक्स, खेळण्याचे साहित्य, स्त्रियांना आरोग्य पेटी व प्रथमोपचार बॉक्स असे साहित्य पुरविले जाते.

Belgaum Varta Belgaum Varta