Saturday , November 7 2026
Breaking News

हिडकल जलाशयातील पाणी हुबळी – धारवाडला सोडू नका : विविध संघटनांची मागणी

Spread the love

 

बेळगाव : हुबळी-धारवाड औद्योगिक क्षेत्राला हिडकल जलाशयातून पाणीपुरवठा होत असल्याच्या विरोधात बेळगावात विविध संघटनांनी तीव्र आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

हिडकल जलाशयाच्या पाण्याच्या अस्तित्वासाठी अनेक संघटनांनी एकत्र येऊन बेळगावात “आमचे पाणी आमचा हक्क” आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे आज त्यांनी चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांना थांबवल्याने आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करून निषेध केला. त्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना प्रकल्पाचे काम तातडीने थांबवण्याचे निवेदन दिले. निवेदन प्राप्त झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाबाबत नोटीस बजावून शासनस्तरावर चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *