
बेळगाव : हुबळी-धारवाड औद्योगिक क्षेत्राला हिडकल जलाशयातून पाणीपुरवठा होत असल्याच्या विरोधात बेळगावात विविध संघटनांनी तीव्र आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
हिडकल जलाशयाच्या पाण्याच्या अस्तित्वासाठी अनेक संघटनांनी एकत्र येऊन बेळगावात “आमचे पाणी आमचा हक्क” आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे आज त्यांनी चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांना थांबवल्याने आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करून निषेध केला. त्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना प्रकल्पाचे काम तातडीने थांबवण्याचे निवेदन दिले. निवेदन प्राप्त झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाबाबत नोटीस बजावून शासनस्तरावर चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Belgaum Varta Belgaum Varta