Sunday , December 14 2025
Breaking News

बनावट कागदपत्रे तयार करून 8 एकर 21 जमीन बळकावली

Spread the love

 

बेळगाव : बनावट कागदपत्रे तयार करून 8 एकर 21 जमीन हस्तांतरित करून फसवणूक केल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
ही घटना बेळगाव तालुक्यातील बाची गावात घडली. 2003 मध्ये विजय आसगावकर यांचे निधन झाले, त्यांच्या आई कमलाबाई आसगावकर 2001 मध्ये निधन झाले. मृत्यूपूर्वी कमलाबाईंनी तक्रारदार महिलेचा पती विजय असगावकर यांच्या नावाने मृत्युपत्र तयार करून, बेळगाव बाची येथील आर. एस. नंबर 59, 60, 62/1, एकूण 8 एकर 21 गुंठे जमीन त्यांच्या मुलाच्या नावावर द्यावी, असा उल्लेख केला होता. मात्र, काही कारणांमुळे ती मालमत्ता त्यांच्या पतीच्या नावावर हस्तांतरित करण्यात आलेली नव्हती. मात्र, मुलाच्या मृत्यूनंतर ती सुनेच्या मालकीचे झाले नाही. यानंतर, सदर जमीन 20 एप्रिल 2023 रोजी बेळगाव सब-रजिस्ट्रार कार्यालयात आरोपी सागर दत्तात्रय जाधव यांना विकण्यात आल्याचे नोंदवण्यात आले. सून विनीता विजय आसगावकर रहाणार मुंबई यांनी कंग्राळी बी.के. गावातील सागर जाधव, मुत्यानट्टी गावचे सुरेश बेळगावी, साहुकार गल्ली, कडोली येथील शांता नार्वेकर आणि कलमेश्वर गल्ली, कडोली येथील हारुण ताशिलदार यांच्या विरोधात बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आतापर्यंत 4 आरोपीना अटक करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

संत मीरा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सप्तशक्ती संगम व भगवद्गीता जयंती उत्साहात साजरी

Spread the love  बेळगाव : संत मीरा इंग्लिश मिडियम स्कूल, लक्ष्मीनगर, हिंडलगा येथे विद्या भारती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *