खानापूर : काय करणार ताई रोजगारच बंद हाय….तो चालू व्हता तंन बर व्हत.. हे उदगार आहेत, हलशी जवळील शेतात काम करणाऱ्या महिलांचे! अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर या खानापूर दौऱ्यावर असून, त्या कापोलीवरून चिक्कमुनवळीकडे जात असतांना हलशी पुलाजवळील शेतात दुपारच्या सुमारास काही महिला जेवणासाठी बसल्याचे डॉ.निंबाळकर यांच्या नजरेस पडले, अन् त्या थांबल्या… बांधावर जावून महिलांशी गप्पा गोष्टी मारल्या.. तब्बल अर्धा तास रंगलेल्या चर्चेमध्ये महिलांनी अनेक समस्या ताईंसमोर मांडल्या. यात रोजगार हमी योजनेबद्दल म्हीलानी अधिकच नाराजी व्यक्त केली. त्यावर डॉ. निंबाळकर यांनी केंद्रातून या योजनेसाठी येणारा निधी कमी केल्यामुळे ही योजना बंद ठेवण्याची वेळ राज्यांवर आली आहे. मोदी सरकारने या योजनेसाठी कालच्या अर्थसं अर्थसंकल्पमध्ये कमी निधी ठेवल्याने ही समस्या निर्माण झाली असून, केंद्र सरकार राज्यावर अन्याय करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
केंद्राकडून पूर्वीप्रमाणे निधी उपलब्ध झाला तर ही योजना पुन्हा सूरू ठेवण्यास कोणताही अडचण येणार नाही असे डॉ. निंबाळकर म्हणाल्या.
गेल्या काही वर्षात रोजगार हमी योजनेमुळे गोरगरीब जनतेला विशेषकरुन महिलांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. पण, अलीकडे खानापूर तालुक्यात बहूतेक ठिकाणी रोजगार हमी योजना बंद ठेवण्यात आल्याने महिलांना याचा फटका बसला आहे. त्यामुळेच मा. आ. निंबाळकर यांच्यासमोर हलशी पुलाजवळील शिवारातील महिलांनी रोजगारबाबत खंत व्यक्त केली.
डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी जाणून घेतल्या अनेक गावच्या समस्या…
खानापूर दौऱ्यावर असलेल्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी तालुक्यांतील अनेक गावच्या समस्या काही गावात जावून जाणून घेतल्या. नंदगड येथे तब्बल 21 वर्षांनी होत असलेल्या लक्ष्मी यात्रेला भरीव निधी उपलब्ध करुन देण्यासाठी देवस्थान कमिटीने डॉ. निंबाळकर यांची भेट घेतली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद आ. डॉ.निंबाळकर यांनी दिला. सरकारदरबारी चांगले वजन असल्याने डॉ. निंबाळकर यांच्याकडून समस्या दूर होत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.