
बेळगाव : बेळगाव येथील सुप्रसिद्ध असलेल्या मराठा युवक संघाच्यावतीने मंगळवार दि. २५ रोजी ‘बेळगाव श्री’ अशी प्रतिष्ठेची शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांनी दिली. मराठा युवक संघाची बैठक आज मंगळवारी मराठा मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशन आणि कर्नाटक बॉडी बिल्डिंग असोसिएशन व बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्धनावर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात येणार आहे. असा ठराव पास करण्यात आला. या बैठकीला अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, उपाध्यक्ष मारुती देवगेकर, सेक्रेटरी चंद्रकांत गुंडकल, कार्याध्यक्ष रघुनाथ बांडगी, नेताजी जाधव, शेखर हंडे, सुहास किल्लेकर, नारायण किटवाडकर, शिवाजी हंगेरीगेेकर, दिगंबर पवार, विनोद हंगेरगेकर, मोहन चौगुले, लक्ष्मण होनगेकर, पांडुरंग जाधव, श्रीकांत देसाई, संजय मोरे, शिवाजी हंडे, प्रभाकर कडोलकर, विजय बोंगाळे, आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta