Sunday , July 26 2026
Breaking News

कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक, ७ जणांचा मृत्यू

Spread the love

 

प्रयागराज : कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅव्हलरला ट्रकने धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये नागपूर प्रयागराज राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली.दरम्यान याचवेळी दुसऱ्या बाजूने येणारी कारही ट्रकमध्ये घुसली

अपघाताच्या घटनेनंतर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. तर वाहनं बाजूला करण्यासाठी क्रेनची मदत घेतली जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ट्रक जबलपूरहून कटनीच्या दिशेने जात होता. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सिहोरातील मोहला बरगी गावाजवळ ट्रकचा टायर अचानक फुटला. त्यामुळे कारला धडक देऊन ट्रक विरुद्ध दिशेच्या लेनवर पोहोचला. तेव्हा समोरून येणाऱ्या ट्रॅव्हलरला धडक दिली. प्रयागराजहून आंध्र प्रदेशला परतणाऱ्या ट्रॅव्हलरला धडक बसून जागीच सात जणांचा मृत्यू झाला.

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *