Monday , September 21 2026
Breaking News

श्री समादेवी उत्सवानिमित्त नवचंडीका होम; महाप्रसाद उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ आणि श्री समादेवी संस्थान समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळालातील शेवटच्या दिवशी मंगळवारी सकाळी नव चंडिकाहोम आणि महाप्रसाद उत्साहात पार पडला. सकाळी श्री. समादेवी मूर्तीला महाअभिषेक केल्यानंतर संदीप कडोलकर, सौ. स्मिता कडोलकर, वैष्णवी धनवडे यांच्या हस्ते नवचंडिका होमला प्रारंभ झाला. यावेळी ऋषिकेश हेर्लेकर गुरुजी, नवाथे गुरुजी पुणे, भूषण काने पुणे, राजेश रानडे गुरुजी पुणे, नीलकंठ हेर्लेकर गुरुजी, दत्तात्रय भावे गुरुजी, पवन देशपांडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली नवचंडिकाहोम मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावाने करण्यात आला. दुपारी १२ वाजल्यानंतर श्री समादेवीला नैवेद्य दाखवून महाप्रसादाला प्रारंभ झाला. यावेळी हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. नवचंडिका होम आणि महाप्रसाद यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष दत्ता कणबर्गी, विश्वस्त मोहन नाकाडी, महादेव गावडे, मोतीचंद दोरकाडी, सेक्रेटरी अमित कुडतुरकर, युवा संघटना अध्यक्ष रोहन जुवळी, उपाध्यक्ष रवी कलघटगी, महिला मंडळाच्या अध्यक्षा अंजली किनारी, सेक्रेटरी वैशाली पालकर, प्रसाद निखार्गे, परेश नार्वेकर आणि कार्यकारी मंडळ महिला मंडळ सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *