Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगावात भरदिवसा गोव्याच्या माजी आमदाराचा खून

Spread the love

 

बेळगाव : गोव्याचे माजी आमदार लहू मामलेदार यांचा आज शनिवारी दुपारी बेळगाव शहरातील खडेबाजार परिसरात खून झाला आहे. एका रिक्षा चालकाने केलेल्या जोरदार हल्ल्यात मामलेदार यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आरोपी रिक्षाचालकाला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार गोव्याचे माजी आमदार लहू मामलेदार हे बेळगाव येथील खाडेबाजार परिसरात असलेल्या श्रीनिवास लॉजमध्ये उतरले होते. आज दुपारी ते आपले कार घेऊन येत असताना एका रिक्षाला कारची धडक बसली. यावरून मामलेदार आणि रिक्षाचालकात वादावादी झाली. यावेळी रिक्षा चालकाने मामलेदार यांच्या कपाळावर जोरदार प्रहार केला. मामलेदार त्या हल्ल्यातून सावरत लॉजकडे निघाले असतानाच रिसेप्शन काउंटर जवळ कोसळले. लॉजच्या मॅनेजरने या घटनेची माहिती मार्केट पोलिसांना दिली. मार्केट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लहू मामलेदार यांना बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता ते मृत असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. याप्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे. त्याच्याकडून पुढील चौकशी सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे बेळगाव विमानतळावर स्वागत

Spread the love  बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील तीर्थ क्षेत्र यडूर येथील श्री वीरभद्रेश्वर मंदिरात आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *