Thursday , March 5 2026
Breaking News

येळ्ळूरमधील विविध संघटनांच्या वतीने राजकुंवर पावले यांचा सत्कार

Spread the love

 

येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या व भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या सौ. राजकुंवर तानाजी पावले यांची बेळगाव दक्षिण भाजपा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, येळ्ळूर गावामधील विविध संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रस्ताविकामध्ये प्रा. सी. एम. गोरल यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती दिली. त्यानंतर नेताजी युवा संघटना, येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघ, सिद्धेश्वर युवक मंडळ, मरगाई युवक मंडळ या संघटनांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. येळ्ळूर ग्रामपंचायत सदस्य विलास बेडरे यांनी त्यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना राजकुंवर पावले म्हणाल्या, गावच्या विकासा बरोबरच, दक्षिण भागाच्या विकासासाठी कार्यरत राहून, महिला व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य विलास बेडरे, राजू डोन्यान्नावर, माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश देसुरकर, रमेश धामणेकर, यल्लुप्पा पाटील, बळीराम देसुरकर, परशराम बिजगरकर, बी. एन. मजुकर, प्रा. सी. एम. गोरल, डॉ. तानाजी पावले, सुभाष मजुकर, सौ. राणी देसुरकर, प्रकाश डोन्यान्नावर आदी यावेळी उपस्थित होते. शेवटी बळीराम देसुरकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *