Thursday , March 5 2026
Breaking News

मराठी प्राथमिक शाळा नं. 5 शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व आदर्श विद्यार्थी विद्यार्थिनी पारितोषिक सोहळा

Spread the love

 

बेळगाव : दिनांक 17/02/2025 सोमवार रोजी शाळा नं 5 चवाट गल्ली येथे विध्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी संघातर्फे आदर्श विद्यार्थी विद्यार्थिनी पारितोषिक वितरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
आजच्या कार्यक्रमाला या शाळेचे माजी विद्यार्थी संघांचे अध्यक्ष श्री. दीपक किल्लेकर सर अध्यक्ष होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्री. अनंत लाड सर उपस्थित होते.
प्रारंभी, मुचंडीकर सर यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या वार्षिक प्रगतीचा आढावा घेतला.
यावेळी माजी विद्यार्थी संघ आणि दीपक किल्लेकर पुरस्कृत दरवर्षी दिला जाणारा आदर्श विद्यार्थी व आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार जाहीर करण्यात आला. सन 2024-25 सालातील आदर्श विद्यार्थी म्हणून इ. 7 वी चा विद्यार्थी, समर्थ कलखांबकर याची तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून दिपाली पाटील हिची सर्वानुमते निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना ढाल व रोख बक्षीस उपस्थित मान्यवरांकडून प्रदान करण्यात आले. यानंतर, प्रमुख वक्ते श्री. अनंत लाड यांनी आपल्या भाषणात मुलांना आणि पालकांना मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे महत्व पटवून दिले. तसेच मुलांना मनापासून अभ्यास करण्यास आणि व्यायाम करण्यास सांगितले. नकारात्मक विचार दूर करून सकारात्मक विचारांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी त्यांनी कानमंत्र दिला.
अध्यक्षीय भाषणात श्री. दीपक किल्लेकर यांनीही मुलांना यशस्वी होण्यासाठी चांगला अभ्यास करण्याचा सल्ला दिला.
यानंतर मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमांना मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सदर कार्यक्रमास माजी विद्यार्थी संघांचे दीपक किल्लेकर, रवी नाईक, श्रीकांत कडोलकर, विनायक मोहिते, अनंत लाड व इतर पदाधिकारी, पालक व एसडीएमसी पदाधिकारी आणि शाळेचा सर्व स्टाफ उपस्थित होते..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पी. ए. माळी यांनी केले. आभार श्री. कांबळे यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *