
येळ्ळूर : येळ्ळूर येथील प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटीच्या अध्यक्षपदी माधुरी पाटील यांची तर उपाध्यक्षपदी सुरेखा सायनेकर यांची एकमताने पुढील पाच वर्षासाठी निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून डेप्युटी रजिस्ट्रॉर रवींद्र पाटील यांनी काम पाहिले. तर संचालिका म्हणून वैशाली मजुकर, नम्रता पाटील, रेखा हणमंत पाटील, रेखा पाटील, राजश्री दणकारे, पूजा कंग्राळकर, रूपा धामणेकर, वंदना कदम , लक्ष्मी हुवान्नावर, यांची निवड करण्यात आली. तर सल्लागार म्हणून शिवाजी सायनेकर, एन एफ बस्तवाडकर व प्रमोद जाधव यांची निवड करण्यात आली. नूतन संचालक मंडळाच्या पदग्रहण प्रसंगी नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, नवहिंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर, न्यू नवहिंद सोसायटीचे चेअरमन नारायण जाधव, नवहिंद महिला प्रबोधन संघाच्या अध्यक्षा नीता जाधव व वाय. सी. गोरल उपस्थित होते. वाय. सी. गोरल यांनी नूतन संचालक मंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नवहिंदचे चेअरमन प्रकाश अष्टेकर, व्हाईस चेअरमन अनिल हुंदरे, उदय जाधव आनंद पाटील यांनी नूतन संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रशांत कंग्राळकर यांनी केले. सेक्रेटरी अँथोनी अल्मेडा यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta