बेळगाव : सालाबादप्रमाणे पुणे स्थित शिवाजी ट्रेल ह्या संघटनेमार्फत जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मराठा सैन्याच्या भारत भर पाऊल खुणा असलेल्या गडांवर, स्वराज्यातील सरदार घराण्यांच्या वंशजांच्या हस्ते, एकाच दिवशी, जास्ती जास्त गडांवर पुजा केली जाते. त्याचाचं भाग म्हणून बेळगाव येळ्ळूर जवळील किल्ला, राजहंस गडाची सपत्नीक पूजा शिवाजी ट्रेलचे संयोजक आणि सद्भावना दूत श्रीमंत रमेशराव केशवराव रायजादे, हारोलीकर सरकार आणि दिलीपराव केशवराव रायजादे हारोलीकर सरकार, यांच्या हस्ते दि. २३/०२/२०२५ रोजी पार पडली. या कार्यक्रमाच्या मार्फत भावी पिढीला ह्या गड किल्ल्यांचे महत्व पटवून देणे आणि किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन व्हावे या उद्देशाने किल्ल्यांचे पूजन केले जाते.कर्नाटक सरकार व केंद्र सरकारने या किल्ल्यांचे संवर्धन करावे जेणे करून हे किल्ले भावी पिढीला पहायला मिळतील. हे किल्ले म्हणजे जुन्या काळातील शुरवीरांनी आपलं रक्त सांडून केलेल्या पराक्रमाचे हे किर्तीस्तंभ आहेत. त्याचे जतन होने ही काळाची गरज आहे.
पुजेचे पौरोहित्य श्री. बसवराज मठपती ह्यांनी केले. ह्या कार्यक्रमाला श्रीमंत सौ. सुचिता रमेशराव रायजादे हारोलीकर सरकार, श्रीमंत दिलीपराव केशवराव रायजादे हारोलीकर सरकार, श्रीमान सतीशराव कृ. चीरमोरे, किल्लेदार गडकरी, पारगड, सौ. स्मिता सतीशराव चीरमोरे, किल्लेदार गडकरी, पारगड, सर्व कु. चि. कुलदीपराव रायजादे, चि. शिवराज चीरमोरे, तसेच कार्यक्रमाला धारवाडचे सर्व श्री. किरण जाधव केतन हजेरी, भिम जे.के., सागर दोडवाड, आखिल पवार, शशिकुमार दोडवर आदी शिवप्रेमी वउपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta