बेळगाव : येथील मराठा मंडळ फार्मासी महाविद्यालयात २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णु कंग्राळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खोखो, क्रिकेट, थ्रोबॉल, हॉलीबॉल, रनिंग 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, गोळा फेक, थाळी फेक, लांब उडी, कॅरम, बुद्धिबळ अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. क्रीडाविभाग प्रमुख डॉ. महेश भानुशाली यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समितीच्या सुयोग्य नियोजनामुळे या स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊ गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली. या दोन दिवसांच्या स्पर्धा कालावधीत प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta