Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूर समितीच्या वतीने सीमा सत्याग्रही कै. पुंडलिक मामा चव्हाण, कै. श्रीमती अन्नपूर्णा चव्हाण यांची शोकसभा शनिवारी

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सीमा सत्याग्रही कै. पुंडलिक मामा चव्हाण तसेच कै. माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण यांच्या पत्नी कै. श्रीमती अन्नपूर्णा विठ्ठलराव चव्हाण यांची शोकसभा शनिवार दिनांक १ मार्च २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे कै. माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण सभागृहात बोलावण्यात आलेली आहे. तरी खानापूर तालुक्यातील समस्त मराठी जनतेने या शोकसभेला उपस्थित राहावे असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील व निरंजन सरदेसाई आणि सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी, समितीचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *