नागरिकांनी अवयवदान देहदानाचे महत्त्व जाणुन गरजूंना मदत करण्यासाठी पुढे यावे : जायंट्स मेनचे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील
बेळगाव : नागरिकांनी अवयवदान देहदानाचे महत्त्व जाणुन गरजूंना मदत होण्यासाठी पुढे येणे गरजेचे असून जायंट्स आय फौंडेशनच्या माध्यमातून खूप मोठ्ठे कार्य बेळगाव परिसरात होत आहे जायंट्स मेन सतत त्यांना सहकार्य करत असते असे विचार जायंट्स मेनचे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी व्यक्त केले.
जायंट्स आय फौंडेशन आणि जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन यांच्या वतीने आणि प्रदीप चव्हाण यांच्या सहकार्याने वडगाव आणि अनगोळ येथील वैकुंठभूमीत नेत्रदान देहदान आणि अवयवदाना विषयी जनजागृती फलक लावण्याचा कार्यक्रम पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आय फौंडेशनचे अध्यक्ष मदन बामणे यांनी प्रास्ताविक करीत असताना अवयवदान देहदान ही जनजागृती प्रत्येक समाज घटकापर्यंत पोहोचावी या उद्देशाने आम्ही सतत प्रयत्नशील आहोत त्यानुसार कार्य करीत असताना सदस्य प्रदीप चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी फलकाचा भार उचलला अशाच पद्धतीने इतरांनी सुद्धा अशा पद्धतीने सहकार्य करावे अशी विनंती केली.
यानंतर प्रमुख पाहुणे नगरसेवक मंगेश पवार यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मंगेश पवार यांनी जनजागृती उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करून भविष्यात अशा सुंदर उपक्रमास आम्ही मदत करू असे सांगितले.
यावेळी जायंट्स आय फौंडेशनच्या आवाहनास प्रतिसाद देत देवकुमार बिर्जे यांनी सपत्नीक मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय घेतला त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी आय फौंडेशनचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील, जायंट्स मेनचे माजी अध्यक्ष उमेश पाटील, अशोक हलगेकर, संजय पाटील, सचिव मुकुंद महागावकर, उपाध्यक्ष अरुण काळे, मधू बेळगावकर, विश्वास पवार, विजय बनसुर, पद्मप्रसाद हुली, यल्लाप्पा पाटील, रणजित पवार, आनंद कुलकर्णी उपस्थित होते.