बेळगाव (प्रतिनिधी) : शास्त्रीनगर येथील दि. आदर्श एज्युकेशन सोसायटी संचालित ज्ञानमंदिर इंग्रजी शाळेत महिला दिनाच्या निमित्ताने नारीशक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नारीशक्ती सन्मान पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांच्यासह नगरसेवक राजू भातकांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले. आ. अभय पाटील यांनी यावेळी बोलताना शाळेत स्मार्ट बोर्ड करिता पाच लाख रुपयांची मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपाध्यक्ष संजीव नेगिनहाळ, मारुती दळवी, आप्पाजी नाईक, प्राचार्या अलका जाधव, फरीदा मिर्झा आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांना गौरविण्यात आले. बसवाहक अनुसया मुनवळी, गृहिणी गीता पाटील, नीता चौगुले, रिक्षा चालक समीना शेख, मेसचालक ललिता चौगुले, पोलीस ललिता पुराणिक, टेलर गीता दैवज्ञ, कर्मचारी पुष्पा मट्टी यांचा सन्मान करण्यात आला.
महिला वर्गासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.. फुले व फळांचे डेकोरेशन स्पर्धा, केशभूषा स्पर्धा, पाककृती स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आली. कार्यक्रमाला मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम संयोजनासाठी शिक्षक व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta