
बेळगाव : उत्तर कर्नाटकातील प्रमुख औद्योगिक नगरीत प्रथमच शाॅपिंग उत्सव प्रदर्शनात इलेक्ट्रिक वाहन, फर्निचर, गुंतवणूक व विमा प्रदर्शनाचे आयोजन यश इव्हेंट्स व यश कम्युनिकेशनने मराठा मंदिर येथे शुक्रवार दि. 7 ते मंगळवार दि. 11 मार्च दरम्यान 5 दिवस आयोजित केले असून एकाच छताखाली 75 स्टॉल मधून सुमारे 10 हजार वस्तूं मांडण्यात आल्या आहेत. बेळगावकरांनी प्रदर्शनाला भरपूर प्रतिसाद दिला आहे.
सदर प्रदर्शनात ईव्ही ऑटो एक्स्पो विभागात माणिकबाग ऑटोमोबाईलतर्फे टाटा, यश ऑटो अँपरी, अरुणोदय मोटर्स ओपीजी मोबिलिटी, नागशांती विदा, बेळगाव हब रिवोल्ट मोटरसायकल, एमजी इ कार, आथर इ बाईक, एम बी मोटर्सतर्फे बीगाॅस आदी
शाॅपिंग उत्सव विभागात शुभसंगम दड्डी ज्वेलर्स, ग्लोबल अकादमी ऑफ फॅशन, स्क्वेअर कटतर्फे विविध प्रकारच्या सायकल, इंडस नेपाळ रुद्राक्ष प्रदर्शन, टाटा पाॅवर सोलार, महालक्ष्मी डिस्ट्रीब्युटरची आटा चक्की व गुळाची चहा काॅफी पावडर, काॅटन बेडशीट पिलो कव्हर, मुखवास, खादी शर्ट, ओरिफ्लेम प्रसाधने, आर्टिफिशियल ज्वेलरी, इलकल काॅटन साडी, घागरा चोली, मैसूर आयुर्वेदिक केसांचे तेल, कोरियन वेस्टर्न ड्रेस, साडी ड्रेस मटेरियल, वेस्टर्न स्प्रे, शू रॅक, जयपूरी कुर्ता पायजमा, पाॅप काॅर्न मशिन, 40 ते 70 टक्के सवलतीच्या खजिन्यात विविध वस्तूंचा खुला बाॅक्स, आयुर्वेदिक औषधे, पतियाला सूट, विविध प्रकारचे पापड, होम क्लिनर, इमिटेशन फॅन्सी ज्वेलरी, घरगुती उपयोगी उपकरणे, राजस्थानी लोणची, खादी शर्ट कुर्ता पायजमा, पेस्ट कंट्रोल, स्टेन रिमूव्हर, टीव्ही फ्रीज कव्हर, लेडीज टाॅप्स, लहान मुलांची खेळणी, हैद्राबादी बॅंगल्स, नाईट पायजमा, प्लाझो, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू, फॅन्सी चप्पल, टाॅवर फॅन, डाॅ प्लस चप्पल, युरेका फोर्बस वाॅटर प्युरिफायर, केरला हलवा आदी
फर्निचर विभागात आकर्षंक वुडन झुला व सोफा, सोफा कम बेड, स्लीपवेल मॅट्रेस, करलाॅन मॅट्रेस, जाॅय मॅट्रेस, सेंचुरी मॅट्रेस, कर्टन्स, कार्विंग फर्निचर, काश्मीर कार्पेट्स, ब्रास झुला आदी
विमा व गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज स्टेट बॅंक ऑफ इंडीया लाईफ इन्शुरन्स व दत्ता कणबर्गी सल्लागार, जन स्माईल फायनान्स बॅंक यामध्ये सहभागी आहेत.
खवय्यांसाठी मॅग्नेटा आइस्क्रीम, स्प्रिंग पोटॅटो, स्वीट कॉर्न आदी उपलब्ध आहे. प्रदर्शनाचा आज मंगळवार शेवटचा दिवस असून सकाळी 10.30 रात्री 9 पर्यंत सुरु राहणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta