बेळगाव : मराठी विद्यानिकेतन येथे चॅम्पियन्स ट्रॉफी फत्ते केलेल्या भारतीय संघाचा कौतुक सोहळा दिमाखदार करण्यात आला.
कर्णधार रोहित शर्माचे शानदार अर्धशतक, याला भारतीय फिरकीपटूंची मिळालेली उत्तम साथ या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलँडला नमवत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावले. विद्यार्थ्यांनी नाशिक ढोलच्या गजरात टीम इंडियाचे कौतुक केले. टीम इंडियाच्या खेळाडूंच्या जर्सीसहित इयत्ता पाचवीचे विद्यार्थी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटून आनंद सोहळा साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व, खिलाडूवृत्ती, कठीण परिश्रम, सामान्य ज्ञान समजावून देणे हाच याचा उद्देश होता.
याप्रसंगी शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत व सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. शाळेचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta