बेळगाव : बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेवर बंदी घालावी, अशी गरळ कन्नड चळवळीचे प्रमुख वाटाळ नागराज यांनी ओकली आहे.
बऱ्याच वर्षानंतर बेळगावात आलेल्या वाटाळ नागराज यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधातील आपली गरळ ओकून दाखवली. आम्ही सातत्याने म. ए. समितीवर बंदी घालण्याची मागणी करतो. मात्र, त्याकडे कर्नाटक सरकार दुर्लक्ष करते. यामुळे सरकारने म. ए. समितीवर बंदी घातली नाही तर पुढील हिवाळी अधिवेशन बेळगावात होऊ देणार नाही अशी, दर्पोक्ती वाटाळ नागराज यांनी केली आहे.
बेळगावमध्ये सोमवारी कन्नड संघटनांनी ‘बेळगाव चलो’ ची हाक देत सरकारकडे समिती आणि शिवसेनेवर बंदी घालण्याची मागणी करत राणी चन्नम्मा चौकात आंदोलन केले. यासह म्हादई योजनेसंदर्भातही कन्नड संघटनांनी मागणी केली.
Belgaum Varta Belgaum Varta