बेळगाव : रंगांची बेभान उधळण, ओळखू न येणारे चेहरे, सकाळपासून हातात रंग आणि भरलेली पिचकारी घेऊन एकमेकांना रंगवण्यात गुंतलेली चिमुकली मुले, महिला वर्ग, आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत रंगून गेलेले आबालवृद्ध, डीजेवरील ठेक्यावर मनमुरादपणे चिंब झालेल्या मैत्रिणी तसेच युवतींचा उत्साह आणि सप्तरंगाची उधळण करत शुक्रवारी (दि. १४) शहरातील हुलबत्ते कॉलनीत रंगोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रीती कामत, आरती ओझा, रोहिणी पवार, स्वाती हंगीरगेकर, रोहिणी हंगीरगेकर, सोनाली हंगीरगेकर, मीनल जाधव, सीमा मोरे, क्षमा सांबरेकर, सुजाता बाळेकुंद्री यांच्यासह हुलबत्ते कॉलनीतील महिला व बालचमुने रंगोत्सवाचा मनमुराद आनंद घेतला..