
बेळगाव : सुळगा येथील उद्योजक व प्रसिद्ध समाजसेवक श्री. गोविंद टक्केकर यांनी आजच्या आधुनिक युगात शिकण्यासाठी व शिक्षण अधिक परिणामकारक व्हावे यासाठी नवीन तंत्रज्ञान युक्त शिक्षण मिळावे यासाठी श्री चांगळेश्वरी हायस्कूलला एक प्रोजेक्ट भेट दिला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, धैर्य ठेवून अभ्यास करा प्रामाणिकपणे केलेला अभ्यास तुम्हाला पुढील शैक्षणिक जीवनात उपयोगी पडेल परिसरातील शैक्षणिक समस्यांचा विचार करून मी पुढील काळात गरीब, हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य करणार आहे असा मानस त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केला.
याप्रसंगी संस्थापक वाय. एन. मजुकर यांच्या हस्ते गोविंद टक्केकर यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मजुकर सर म्हणाले की, गोविंद टक्केकर हा एक आगळावेगळा समाजसेवक असून पाणी म्हणजे जीवन आणि ते पाणी विना मोबदला स्वखर्चाने देऊन या परिसरात ते उत्तम कार्य करीत आहेत. यापुढे त्यांच्याकडून समाजाची चांगली सेवा व्हावी व त्यांच्या उद्योग व्यवसायाला भरभराट व्हावी अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी कृतज्ञता व्यक्त करताना सचिव प्रसाद मजुकर म्हणाले की, गोविंद टक्केकर हे फक्त आश्वासनच देणारे कार्यकर्ते नसून बोलल्याप्रमाणे वागणारे व कृतिशील असे एक दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत हायस्कूलचे मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. बी. कांबळे व आभार एम. एम. डोंबले यांनी केले. यावेळी प्रायमरीचे मुख्याध्यापक आय. बी. राऊत तसेच प्रायमरीचा संपूर्ण शिक्षक वर्ग व हायस्कूलचा संपूर्ण शिक्षक वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta