
बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या महापौरपदी मंगेश पवार तर कर्नाटक राज्य बॉडी बिल्डिंग असोसिएशन कार्याध्यक्षपदी अनिल अंबरोळे यांची निवड झाल्याबद्दल आदर्श विद्यामंदिर हायस्कूल वडगाव आदर्श ग्रुप पतीने दोन्ही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सरस्वती रोड शहापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला आदर्श विद्यामंदिर हायस्कूलचे एनसीसी शिक्षक सहदेव रेडेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी रेडेकर यांच्या हस्ते महापौर मंगेश पवार तसेच अनिल अमरोळे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना महापौर मंगेश पवार यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबर,जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. अनिल अमरोळे यांनी युवा पिढीला व्यसनापासून दूर नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तरुणांना व्यायामाची आवड लागावी यासाठी विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. रेडेकर यांनी यावेळी समयोचीत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला आदर्श ग्रुपचे बाबू वेगस, अजित कणबरकर, लक्ष्मण जाधव, भालचंद्र गिंडे, दत्ता कारजोळकर, शाम बिर्जे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta