बेळगाव : वाय. पी. एल. ऑर्गनायझेशन कमिटी येळळूर यांच्यावतीने आयोजित केलेल्या येळ्ळूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. सदर स्पर्धेला मुख्य पुरस्कर्ते म्हणून माजी ग्राम पंचायत अध्यक्ष व विद्यमान ग्राम पंचायत सदस्य सतीश बा. पाटील व उद्योजक एन. डी. पाटील हे होते. तसेच स्पर्धेला देणगीदार म्हणून ग्राम पंचायत उपाध्यक्ष प्रमोद पी. पाटील, प्रसाद कानशिडे, मधु नांदुरकर, महेश चौगुले, प्रसाद मजुकर, हॉटेल धडाकेबाजचे मालक आदी पाटील व आकाश पाटील यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेचे विजेतेपद मोरया स्पोर्ट्स येळ्ळूर संघाने पटकावले व उपविजेतेपद एस. आर. एस. येळ्ळूर संघाने पटकावले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा आयोजकांनी प्रयत्न केले.