Sunday , July 26 2026
Breaking News

वादग्रस्त स्वयंघोषीत स्वामी नित्यानंद यांचा मृत्यू?

Spread the love

 

नवी दिल्ली : वादग्रस्त स्वामी नित्यानंद महाराज यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. नित्यानंद यांचे पुतणे श्री नित्या सुंदरेश्वरानंद यांनी या संदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही परवा ही घोषणा केली. स्वामी नित्यानंद महाराजांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बलिदान दिले आहे असे त्यांच्या पुतण्याने जाहीर केले आहे. त्यामुळे स्वामी नित्यानंद महाराजांच्या भक्तांना धक्का बसला आहे. जर नित्यानंद यांचा खरोखरच मृत्यू झाला असेल, तर त्याच्या १०,००० कोटी रुपयांच्या संपत्तीचा वारसदार कोण? आता अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. नित्यानंद यांच्या संपत्तीवर अभिनेत्री रंजीता दावा करू शकते की दुसरे कोणी पुढे येईल याविषयी चर्चा सुरु आहेत. मात्र, अद्यापही स्वामी नित्यानंद यांच्या मृत्यू संदर्भात अधिकृत माहिती मिळालेली नाही.

नित्यानंद स्वामी यांचा १ जानेवारी १९७८ रोजी (४७ वय) तामिळनाडू येथील तिरुवन्नमलई येथे झाला. त्यांच्या वडीलांचे नाव अरुणाचलम आणि आई लोकनायकी आहे. आपल्याकडे दैवी शक्ती आहे असा दावा करणारे आणि मोठ्या संख्येने अनुयायांना आकर्षित करणारे आध्यात्मिक गुरु म्हणून ते प्रसिद्ध झाले. त्यांनी भारतात आणि परदेशात अनेक आश्रम स्थापन केले आहे.त्यांनी स्वतःच्या भक्तांना ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर नेण्यासाठी प्रवचन सुरु केली. परंतू बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला. त्यांच्या विरोधात अनेक कायदेशीर खटले दाखल झाल्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये तपास यंत्रणांना गुंगारा देऊन भारतातून पळ काढला.

नित्यानंद यांचा खरेच मृत्यू झाला? की एप्रिल फूल
नित्यानंद यांच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओनुसार, नित्यानंद यांनी त्यांना १२ वर्षांच्या वयात ‘ज्ञान’ प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. हिंदू धर्माचे आध्यात्मिक गुरु म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांची ४७ देशांमध्ये अध्यात्मिक केंद्रे चालविली जातात.स्वामी नित्यानंद ‘नित्यानंद ध्यानपीठम’ या त्यांनी स्थापन केलेल्या धार्मिक संघटनेचेही प्रमुख आहेत.

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *