बेळगाव : एप्रिल-2025 मध्ये येणाऱ्या श्रीराम नवमी, महावीर जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बेळगावातील कत्तलखाने व मांसाहारची दुकाने बंद ठेवण्याची सूचना महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिल्या आहेत.
6 एप्रिल रविवार श्रीराम नवमी, 10 एप्रिल शुक्रवार महावीर जयंती आणि 14 एप्रिल सोमवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बेळगाव महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सर्व कत्तलखाने/मांसाहारी दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे, ही विनंती. ज्या कत्तलखान्याच्या मालक/मांस दुकानाच्या मालकांनी त्या दिवशी आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.