Thursday , March 5 2026
Breaking News

शाहुनगरात सार्वजनिक जागेत खासगी शाळा बांधण्यास विरोध

Spread the love

बेळगाव : बेळगावातील शाहुनगरातील विनायक कॉलनीतील हनुमान मंदिराशेजारील सार्वजनिक जागेत खासगी शाळा बांधण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत येथे शाळा बांधण्यास परवानगी देऊ नये या मागणीचे निवेदन स्थानिकांनी आज जिल्हाधिकार्‍यांना दिले.
शाहुनगरातील विनायक कॉलनीतील हनुमान मंदिराशेजारी 8 गुंठे सार्वजनिक जागा आहे. या जागेत शाळा बांधण्याचा प्रयत्न कट्टीमनी शिक्षण संस्थेकडून सुरु आहे. त्याला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला आहे. विनायक कॉलनीची आखणी करताना 2 एकर जागा गार्डन, सकाळी फिरण्यासाठी अशा सार्वजनिक उपयोगासाठी राखून ठेवण्यात आली होती. तेथे हनुमान मंदिर आणि समुदाय भवन बांधून स्थानिक रहिवाशी दररोज मंदिरात पूजाअर्चा करतात. मंदिराशेजारी 8 गुंठे जागा खुली आहे. तेथे कट्टीमनी खासगी शिक्षण संस्थेकडून बेकायदेशीररीत्या शाळा बांधण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला विरोध करून स्थानिक नागरिकांनी शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.
या संदर्भात ऍड. कुमार खडकभावी यांनी, सार्वजनिक जागेत खासगी शाळा बांधण्याचा नागरिकांचा विरोध आहे असे सांगून प्रसारमाध्यमाना अधिक माहिती दिली.
निवेदन देतेवेळी नगरसेवक प्रवीण पाटील, श्रेयस नाकाडी, भास्कर शेट्टी, सतीश चित्रगार यांच्यासह विनायक कॉलनी, शाहुनगरचे रहिवासी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *