बेळगाव : बिजगर्णी गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीचा वाढदिवस मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. देवीसमोर केक कापून भक्तांनी आनंदोत्सव साजरा केला.
गावात दोन दिवस पाळणूक ठेवण्यात आली होती आणि त्या पार्श्वभूमीवर देवीचा भंडारा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या दिवशी “ओटी भरण्याचा” सोहळा विशेष आकर्षण ठरला. महिलांनी पारंपरिक पेहरावात देवीची ओटी भरली तसेच साडी, नारळ, फळे आणि हळद-कुंकवाने पूजा केली. या कार्यक्रमात ग्रामस्थ, महिला मंडळ, तसेच तरुण मंडळांनी सक्रिय सहभाग घेतला.
देवीच्या आशीर्वादाने गावात सुख, शांती आणि समृद्धी लाभो, अशी प्रार्थना करत संपूर्ण गावाने एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला.
यावेळी वसंत असतेकर, श्रीरंग भाष्कळ, विष्णु मोरे, मारूती जाधव, गोपाळ पाटील, ग्राम् पंचायत सदस्य संदीप अष्टेकर, मनोहर बेळगावकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta