बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये 17 एप्रिल रोजी छंद वर्गाचा सांगता समारंभ झाला. 24 मार्च ते 17 एप्रिल 2025 या कालावधीत 20 दिवसांसाठी चित्रकला, हस्तकला, क्रीडा, बुध्दीबळ, तबला, हार्मोनियम, नृत्य, झुम्बा, खेळ वर्ग, विज्ञान रंजन या विषयांमधून वैज्ञानिक खेळणी बनवणे, नाट्य वर्ग, वाचन लेखन वर्ग घेण्यात आला. या छंद वर्गात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना व पालकांना आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला विद्यार्थ्यांनी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या छंद वर्गात 400 मुलांनी सहभाग घेतला व हे छंद वर्ग यशस्वी केले. विद्यार्थी मोबाईल, टीव्हीपासून दूर जाऊन वेगवेगळ्या कृतींमध्ये गुंतण्यासाठी तसेच छंद जोपासण्यासाठी या छंद वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन लाभले.यामध्ये अमित कोळेकर, अक्षय शहापूरकर, नागेश हंगिरगेकर, अभय यावलकर, प्रशांत पोतदार, बाळकृष्ण मनवाडकर, लता नगरे, शिवराज चव्हाण, जगदीश कुंटे, अमृत गवस, दत्ता पाटील, महेश हगीदळे, श्रीधर बेन्नाळकर, सुदीप जोशी, शुभम बिलावर, सुप्रिया अडकुरकर, ॲड. प्रथमेश कारेकर, शुभम बिलावर, सहदेव कांबळे, नारायण गणाचारी, संजय हळदीकर, प्रशांत अणवेकर, श्वेता सुर्वेकर, बाळकृष्ण मनवाडकर, हर्षदा सुंठणकर, प्रिती खुडे, पूजा संताजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शेवटच्या दिवशी आपल्या सर्व कला सादर केल्या.
शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील, किरण पाटील व सीए विनायक जाधव, अजय पावशे, शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत, छंद वर्ग प्रमुख इंद्रजीत मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. पालकवर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज चव्हाण यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta