बेळगाव : उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागल्याने पशुपक्ष्यांना त्याचा त्रास होत आहे. अनेक पक्षी यामुळे तहानेने व्याकुळ होत आहेत त्यांचे हाल होऊ नयेत म्हणून नागरिकांनी आपापल्या घराच्या छतावर परसबागेत बाल्कनीमध्ये पाणी आणि धान्य ठेवावे असे आवाहन जायंट्स मेनचे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी केले.
बॉक्साइट रोड वरील ग्रीन गार्डनमध्ये जनजागृती कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
प्रास्ताविक आणि स्वागत करताना सचिव मुकुंद महागावकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
यानंतर मदन बामणे यांनी बोलताना खेडोपाड्यात तलाव विहिरी पाण्याची डबकी अथवा उघड्यावर पाणी मुबलक प्रमाणात असते पण शहरी भागात काँक्रीटीकरण झाल्याने या उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे त्यासाठी प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे सांगितले.
यावेळी गार्डनमध्ये फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना मातीच्या भांड्याचे वाटप करण्यात आले.
उपस्थित नागरिकांनी उपक्रमाचे कौतुक केले, काहीजणांनी स्वतः पाणी ठेवत असल्याचेही सांगून प्रत्येकाने याचे अनुकरण करावे असेही सांगितले.
मातीच्या भांडी वाटप कार्यक्रम प्रसंगी खजिनदार मधू बेळगावकर, फेडरेशन संचालक संजय पाटील, फेडरेशन संचालक सुनिल मुतगेकर, विनोद आंबेवाडीकर, राहुल बेलवलकर, सुनिल मुरकुटे, सुनिल पवार, आनंद कुलकर्णी, प्रदीप चव्हाण, वाय एन पाटील, पुंडलीक पावशे, धनराज जाधव व स्थानिक नागरिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta