बेळगाव : सीईटी परीक्षेदरम्यान जानवे कापून काढण्यात आले. या प्रकारातून ब्राह्मण समाजावर अन्याय झाला आहे. या घटनेचा निषेध करत बेळगावात ब्राह्मण समाजाकडून आज सोमवारी आंदोलन छेडण्यात येणार आहे.
यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत कृष्णमठाचे डॉ. श्रीनिवास आचार्य होन्निदिब्ब यांनी सांगितले की, ब्राह्मण समाजासाठी अत्यंत पूजनीय असलेल्या जानव्याला तोडण्याचे, अपमानास्पद प्रकार घडत आहेत. यामुळे समाजात दुःख व अस्वस्थता पसरली आहे. या कृत्याचा निषेध करत, ब्राह्मण्य टिकवण्यासाठी आणि ब्राह्मण समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी हा एकत्रित निर्णय घेण्यात आला आहे. ब्राह्मण समाजाच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व ब्राह्मण बंधूंनी २१ एप्रिल, सोमवार रोजी सकाळी १०.३० वाजता कित्तूर राणी चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे निवेदन सादर केले जाईल, असे त्यांनी सांगितले. ब्राह्मण समाजावर होणाऱ्या अपमानाचा निषेध व्यक्त करत, ब्राह्मण्याच्या रक्षणासाठी सर्वजण एकत्र असल्याचा संदेश देण्यासाठी, सर्व समाजबांधवांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पत्रकार परिषदेत राम भंडारी, एस. एम. कुलकर्णी, श्रीनिवास आचार्य होन्निदिब्ब, राघवेंद्र कट्टी, नरसिंह सावदत्ती, आर. एस. मुतालिक, श्रीधर हलगट्टी तसेच माजी नगरसेविका अनुश्री देशपांडे उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta