बेळगाव : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करून 28 जणांचा बळी घेतला. या दहशतवादी कृतीच्या निषेधार्थ श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या वतीने बुधवारी आंदोलन छेडण्यात आले. तसेच प्रशासनाला निवेदन सादर करून दहशतवादाचा बीमोड करण्याची मागणी करण्यात आली . श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन सादर करण्यात आले.
कलम ३७० रद्द केल्यानंतरही काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा नंगानाच सुरूच आहे. या दहशतवादाला आळा घालण्यासाठी जम्मू – काश्मीरमध्ये केंद्र सरकारने कठोर कारवाई हाती घेऊन आतंकवाद्यांचा पूर्णपणे नायनाट करण्यात यावा व 28 हिंदू पर्यटकांची हत्या केलेल्या दहशतवाद्यांना कठोर शासन करून मृत्यूदंड देण्यात यावा मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. कित्तूर राणी चन्नमा सर्कल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला त्यानंतर निवेदन सादर करण्यात आले. यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta