Thursday , March 5 2026
Breaking News

येळ्ळूर महाराष्ट्र मैदानात आंतरराष्ट्रीय कुस्तीला प्रारंभ

Spread the love

 

येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री कलमेश्वर, श्री चांगलेश्वरी व श्री महालक्ष्मी देवी अशा संयुक्त यात्रोत्सवानिमित्त आज गुरुवारी रोजी सायंकाळी निकाली कुस्त्यांच्या जंगी कुस्ती मैदानाला मोठा उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी आखाड्याचे पूजन व उद्घाटन प्रमुख पाहुणे उद्योजक ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील त्यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कार्याध्यक्ष प्रदीप देसाई, सतीश कुगजी, विलास नंदी, मोहन कुगजी, हनुमान पाटील, मधु पाटील, आनंद कुंडेकर, नाताजी कदम, दौलत कुगजी, दीपक कर्लेकर, दुधाप्पा बागेवाडी, मोहन कुगजी, श्रीधर कानशिडे, यल्लुपा पाटील, राजू दोड्डणावर यावेळी उपस्थित होते. या मैदानात सर्व आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय मल्लानी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. काही तासभरातच आंतरराष्ट्रीय कुस्त्यांना प्रारंभ होणार आहे. मैदानात प्रथम क्रमांकाची महान भारत केसरी शेरा पंजाब वि. इराणचा आंतरराष्ट्रीय मल्ल मिर्झा इराण यांच्यात होणार आहे.

द्वितीय क्रमांकाची कुस्ती रुस्तुमे हिंद, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख वि. भारत केसरी, अमिन बिनिया, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती रवी चव्हाण वि. भारत केसरी रोहित संचानिया, चौथ्या क्रमांकाची कुस्ती युपी केसरी राजू मलंगा वि. डब्बल कर्नाटक केसरी कार्तिक काटे या अव्वल मल्लांच्या कुस्त्यांसहित ८२ इतर लहान-मोठ्या कुस्त्यांचे आयोजन या आखाड्यात करण्यात आले आहे. चार आकर्षक कुस्त्याही या मैदानात होणार आहेत.

१९८४ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्त्यांचे आयोजन महाराष्ट्र मैदान येळ्ळूरमध्ये करण्यात येते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *