बेळगाव : चार दिवसांपूर्वी गोंधळी गल्ली क्रॉसजवळ वाहन अपघातात गंभीर जखमी झालेले निवृत्त डीडीपीआय संगप्पा यंकप्पा हळंगळी (वय ६८ रा. सरस्वतीनगर, गणेशपूर) यांचा शुक्रवारी सायंकाळी खासगी इस्पितळात मृत्यू झाला. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ६.३० वाजता समादेवी गल्लीतून गोथळी गल्लीला जाणाऱ्या क्रॉसवर बुलेटने मोटारसायकलला ठोकरल्याने ते गंभीर जखमी झाले होते.
त्याचदिवशी त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचारांचा उपयोग न होता शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.
यासंबंधी संगप्पा यांचा मुलगा धनराज हळंगळी यांनी वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. बुलेटस्वार साईप्रसाद सुनील लाटकर (रा. आनंदवाडी, शहापूर) याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर पुढील तपास करीत आहेत रात्री उशिरापर्यंत उत्तरीय तपासणीची प्रक्रिया सुरू होती संगप्पा हकंगळी यांनी डीडीपीआय पदी शिक्षण खात्यात उत्तम सेवा बजावली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta