बेळगाव : हर घर तिरंगा आभियानाप्रमाणे हर घर अपना ग्रंथालयल अभियान विद्यार्थ्यानी चालवावे. येणाऱ्या प्रत्येक उत्सवाला शुभवस्तुंची खरेदी करताना शुभवस्तु म्हणून पुस्तक खरेदीचा ही विचार व्हावा. असे मत बुलकचे उपाध्यक्ष किशोर काकडेंनी मांडले आपल्या भाषणात काकडेनी पुस्तकांचे महत्त्व, पुस्तकांशी मैत्री आणि अनेक भाषा शिका, भरपूर वाचा आणि दररोज कांही लिहा असा विचार सांगितला. घरात आपण जसे देवघर ठेवतो तसे ग्रंथघर ही असावे. आजकाल होम थिएटरची संकल्पना आहे मग होम लायब्ररीचाही विचार व्हावा, असे प्रतिपादन बेळगाव येथील लोकमान्य ग्रंथालय संचालित बुक लव्हर्स क्लबचे उपाध्यक्ष श्री. किशोर काकडे यांनी केले. ते बेळगाव येथील कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटीच्या लिंगराज स्वायत्त महाविद्यालयाच्या हिंदी विभाग आणि लोकमान्य ग्रंथालय संचालित बुक लव्हर्स क्लबच्या सामंजस्य करारांतर्गत आयोजित जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने विशेष व्याख्यानामध्ये बोलत होते. त्यांनी पुस्तकांचे महत्व सांगून अरुणिमा सिन्हा यांच्या “एवरेस्ट की बेटी” या हिंदी कादंबरीचा परिचय करुन दिला. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित केला गेला होता. व्यासपीठावर हिंदी विभाग प्रमुख प्रा. अर्जुन कांबळे आणि प्रा. सीमा जनावडे उपस्थित होते.
या वेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्रा. अर्जुन कांबळे आणि प्रा. सीमा जनवाडे यांनी केले. या वेळी प्रेमचंद क्लबचे सदस्य कु. वैष्णवी पाटील, समीक्षा पाटील, वासवी भाट पुस्तकाचा परिचय करुन दिला.
या वेळी हिंदी विभागाच्या सहायक प्राध्यापिका सीमा जनवाडे म्हणाल्या की, पुस्तके मानवाला ज्ञान देतात. आजच्या डिजिटल काळात पुस्तकांचे महत्व कायम आहे. विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांनी प्रचंड वाचनाची आवड निर्माण करावी आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा. तसेच त्यांनी जगदिश चंद्र यांच्या “धरती धन न अपना” या हिंदी कादंबरीचा परिचय करुन दिला.
या वेळी प्रमुख पाहुणे श्री.किशोर काकडे यांना पुस्तक आणि शाल देऊन गौरव करण्यात आला कु.संगीता एडके हिने स्वागत गीत सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नक्षत्रा कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. सुहानी चिकोन हिने केले. या कार्यक्रमाच्या सफलतेसाठी प्रा. सीमा जनवाडे आणि डॉ. कलावती निंबाळकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी- विद्यार्थिंनी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta