
बेळगाव : महिलांचे लाडके व्यासपीठ असलेले तारांगण आणि समाजसेवेमध्ये अग्रेसर असलेले रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईट यांच्यावतीने रविवार दिनांक 4 मे रोजी सकाळी 10 वाजता बाईक रॅली वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम इनोव्हेशन या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत.
वी डेकोर, ग्लॅमर मफतलाल, बेनली कीवे हे कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. रामनाथ मंगल कार्यालय भाग्यनगर या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली आहे.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे
18 वर्षावरील बेळगावची महिला यात सहभागी होऊ शकते.
कोणतीही टू व्हीलर चालक महिला यात सहभागी होऊ शकते. स्पर्धेसाठी प्रवेश मोफत आहे. स्पर्धकाने भारतीय पारंपारिक वेशभूषा परिधान करण्याची आहे. स्पर्धकाचा वेशभूषा व टू व्हीलरची सजावट आकर्षक असावी. सर्व स्पर्धकांनी दहा वाजता स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
रामनाथ मंगल कार्यालय आरपीडी – गोवावेस सर्कल – रामनाथ मंगल कार्यालय हा बाईक रॅलीचा मार्ग राहील. परीक्षकांनी परीक्षण केल्यानंतरच बाईक रॅली सुरू होईल. 11 वाजता बाईक रॅली सुरू होईल. 11 नंतर.येणारे स्पर्धक बाईक रॅलीत सहभागी होऊ शकतात पण स्पर्धेत अपात्र ठरतील. अंतिम निर्णय परीक्षकांचा राहील. नावनोंदणीची अंतिम मुदत 2 मे 2025 ही आहे.
आकर्षक बक्षिसे : प्रथम क्रमांक – 5000 रुपये, द्वितीय क्रमांक – 3000 रुपये, तृतीय क्रमांक 2000 रुपये तसेच पहिल्या तीन क्रमांकासाठी सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. क्रमांक 4 ते क्रमांक 8 पर्यंत विशेष बक्षीस देण्यात येईल. 20 उत्तेजनार्थ विजेत्यांना बक्षीस गिफ्ट कूपन वी डेकोर फर्निशिंग कडून रु.400 चे 30 विजेत्यांना गिफ्ट. सर्व स्पर्धकांना इ – प्रमाणपत्र देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क
जयश्री दिवटे 9341411186, रो.विशाल मुरकुंबी 8310777293, अनुराधा मडीवाळ 6361655304
Belgaum Varta Belgaum Varta