
बेळगाव: राजे शहाजी राजे यांचे होदेगिरी येथील समाधीला भेट देण्यासाठी व समाधीच्या सुधारणा कार्यक्रमाला चालना मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत यासाठी पुढील वाटचाल आखण्यासाठी मराठा समाजातर्फे कार्यकर्ते रवाना झालेले आहेत. त्याचबरोबर मराठा समाजाचे स्वामी मंजुनाथ स्वामी यांचा सत्कार 15 मे रोजी बेळगाव येथे होणार आहे त्यासाठी त्यांना आमंत्रण देण्यासाठी कार्यकर्ते बेंगलोरयेथे स्वामींची भेट घेणार आहेत. मराठा समाजाचा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करून समाजाला एकत्र करण्याचा मानस कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला. यावेळी दत्ता जाधव, किरण जाधव, संजय कडोलकर, सुनील जाधव, सागर पाटील, चंद्रकांत कोंडूस्कर, रमेश रायजादे, गुणवंत पाटील, माधव पाटील, रमेश गोरल, प्रदीप चव्हाण, विशाल कंग्राळकर, केदारी करडी, मोहन पाटील, राजन जाधव, यासह अन्य मराठा बांधव उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta